विधान भवनच्या कॉरिडॉरमध्ये जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांची गळाभेट, गप्पाही रंगल्या; चर्चांना उधाण

0
289

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू झाला आहे. इर्शाळवाडीची दुर्घटना, राज्यातील पूरस्थिती, आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यांवरून विधानसभा आणि विधान परिषदेत खडाजंगी झाली. विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आले. अशातच आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट झाली.

विधान भवनाच्या कॉरिडॉरमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये छान गप्पाही रंगताना दिसल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

ही बातमी पण वाचा : कल्याण! बाळ नाल्यात पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं?; बाळाच्या आजोबांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…

दरम्यान, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची भेट आणि त्यांचे गप्पा मारत असतानाचे क्षण कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाले आहेत. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे दोन्ही नेते अतिशय मित्रासारखे हसत चर्चा करत होते. त्यांच्याकडे पाहून ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत, असं वाटणार देखील नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजित दादा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

मोठी बातमी! टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांची मोठी

“अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला नसता, तर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं थेट विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here