Home महाराष्ट्र मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसतंय- देवेंद्र फडणवीस

मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र दिसतंय- देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईमधील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र सध्या दिसतं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.

महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. अशा स्थितीत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन आहेत त्यांना प्रशासकीय अनुभव नाही. पहिल्या लॉकडाउनपासून धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

परप्रांतीयाच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध- शिवेंद्रराजे भोसले

‘या’ मराठी अभिनेत्रीने केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर शेअर

तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार; प्रवीण तरडेंचा शेतकऱ्याला शब्द

निलेश राणे-रोहित पवार यांच्या वादावरुन जयंत पाटलांचा रोहित पवारांना सल्ला; म्हणाले…