पवारांनी काँग्रेसचे चपखल वर्णन केलंं, आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की…; फडणवीसांचा टोमणा

0
372

मुंबई : आजच्या काँग्रेस ही उत्तर प्रदेशातील हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

शरद पवारांनी केलेले वर्णन काँग्रेसचं हे वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आजही जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की, मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर कुटुंबाचे गुजराण सुरु आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबहांनी केलं आहे आणि ते काँग्रेसला चपखल लागू पडत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

‘…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्वागत करू’; नारायण राणेंची ‘त्या’ वक्तव्यावरून पलटी

“काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी, केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत”

“धक्कादायक! 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह 3 जणांचा सामुहिक बलात्कार”

दंडुकेशाही योग्य नाही, सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here