Home देश “धक्कादायक! 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह 3 जणांचा सामुहिक बलात्कार”

“धक्कादायक! 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह 3 जणांचा सामुहिक बलात्कार”

भोपाळ : भाजप नेता, जेडीयू नेता आणि एका पेट्रोल पंप चालकानं एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणातील पलवल येथून घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर भोपाळमधील दोन हॉटेल आणि एका फ्लॅटमध्ये बलात्कार करण्यात आला होता. ही घटना 16-18 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी दिंडोरी भाजप जिल्हा कार्यालय मंत्री मनीष नायक, दिंडोरी जेडीयू जिल्हाध्यक्ष दिनेश आवाडिया आणि पेट्रोल पंप चालक अमित सोनी यांना अटक केली असून तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, पीडितेने अशोका गार्डन पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात FIR दाखल केला होता. पोलिसांनी आरोपींविरोधात मानवी तस्करी, सामूहिक बलात्कार, पॉक्सोसह अनेक कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

दंडुकेशाही योग्य नाही, सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

छगन भुजबळ यांनी कोणतंही चुकीचं काम केलं नव्हतं- गुलाबराव पाटील

केंद्र सरकारच्या पत्रानंतरच राणे कुटूंबियावर कारवाई- दिलीप वळसे पाटील

“कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना”