Home नागपूर दंडुकेशाही योग्य नाही, सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

दंडुकेशाही योग्य नाही, सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

नागपूर : लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. तत्त्पुर्वी परिसरातील दुकानं पोलिसांनी बंद केल्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण होतं. नंतर मुंबई पोलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली आणि मध्यस्थीचा मार्ग काढला.

मात्र त्यानंतर दुकानं सुरु करण्यात आली. त्यानंतर वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी मारहाण केली. आज सकाळी लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलीस यांच्यात वाद झाला होता. यासंदर्भातल्या बातम्यांसाठी तिथे पोहोचलेल्या माध्यम प्रतिनिधींवरच पोलिसांनी राग काढला. अधिकृत पास असतानाही पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत परिसरातून बाहेर जाण्यास सांगितलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला.

पत्रकार त्यांचं काम नियमांचं पालन करुन करत होते, त्यांच्याकडे पासही होते, अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. याची दखल सरकारने घेतली पाहिजे., असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, कारवाई तर झालीच पाहिजे पण अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

छगन भुजबळ यांनी कोणतंही चुकीचं काम केलं नव्हतं- गुलाबराव पाटील

केंद्र सरकारच्या पत्रानंतरच राणे कुटूंबियावर कारवाई- दिलीप वळसे पाटील

“कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना”

“मोदी देश विकण्यासाठी सत्तेत बसले आहेत, त्यामुळे 2024 ला काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार”