आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावरून मनसेनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्थानात व्हावा हे न पटण्यासारखं आहे, असं संदीप देशपांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे गटानं हिंदुत्व सोडलं असल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे .बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे, असं संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
सोलापुरात भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवक भाजपमधून बाहेर