आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धोका असल्यानं त्यांना केंद्र सरकारकडून सूरक्षा देण्याच्या हालचाली सूरू आहेत. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कुणाला धोका असेल आणि त्यामुळे सूरक्षा पुरविली जात असेल तर काही हरकत नाही. त्यात काही चुकीचं नाही. हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आखला जातोय, त्यामुळे काही निर्णय घेतले असतील, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी यावेळी दिली.
हे ही वाचा : “शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मंत्रीपद परत मिळणार?; चर्चांना उधाण”
दरम्यान, राज यांनी भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. भोंगे हटविले नाही तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राज यांनी दिला. त्यामुळे पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने राज यांना, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नही, असा इशारा दिला. त्यामुळे राज यांना मिळालेल्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज यांना सूरक्षा देण्याच्या हालचाली सूरू ठेवल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका
शिवसेनेच्या ‘या’ आमदारांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
संजय राऊत सध्या नैराश्येत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस