आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली. केंद्रातील नेत्यांनी इतर कारखान्यांना मदत केली. पण, मला मदत केली नाही, असा आरोप यावेळी पंकजा मुंडे यांनी केलाय. त्याच्या या आरोपानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपवर हल्लाबोल केलाय.
ही बातमी पण वाचा : आपण कोण माणसं निवडून देतो, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे- राज ठाकरे
भाजपच्या एका दिल्लीतील खासदाराचे घर जीएसटी आणि टॅक्स प्रॉब्लेममध्ये आलं होतं. मात्र, भाजप पक्ष म्हणा किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला?, असं म्हणत एकीकडे बेटी पढाव आणि बेटी बचाव म्हणणारी ही लोक आहेत. मग, पंकजा मुंडे ही भारतीय जनता पार्टीची लेक नाही का ? असा जळजळीत सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला केलाय.
दरम्यान, कोणतंही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर…; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान
शिवसेनेत, राष्ट्रवादीत फूट पाडूनही, भाजपची परिस्थिती सुधारली नाही; रोहित पवारांची टोलेबाजी