आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन राज्यात भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सूरू असतानाच शिवसेनचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?, असा प्रश्न सामनातून यावेळी उपस्थित केला.
भारतीय जनता पक्षात सत्तेसाठी शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा पुळका आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व कसे सोडले यावर सध्या या उपटसुंभांची पोकळ प्रवचने झडत आहेत. खरे तर हिंदुत्व हा पवित्र शब्द उच्चारायचीच त्यांची लायकी नाही., असा हल्लाबोल सामनातून केला.
हे ही वाचा : “सरकारने 97% कुटूंबाचं उत्पन्न कमी केलं, पण मोदीजींचे मित्र दररोज 1000 कोटी कमावतात”
देशातील एकंदरीत स्थिती अशी आहे की, आज हिंदू खतऱ्यात आला आहे. हा मजकूर लिहीत असताना काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळय़ा आणि आक्रोशाने आमचे काळीज अस्वस्थ झाले आहे. कश्मिरी पंडित भीतीच्या सावटाखाली आहेत व त्यांनी मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू केले आहे., असंही सामनात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सुप्रिया सुळे महिलांच्या हक्कांसाठी उतरल्या मैदानात; मुख्यमंत्र्यांकडे केली ’ही’ महत्वाची मागणी
देवेंद्र फडणवीस- अमित शाहांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक; गोवा जिंकण्यासाठी आखणार रणनिती
“जो शेतकरीहिताच्या आडवा येईल त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण”