पुणे : पुण्यात भाजपच्या एका नगरसेवकाचं होर्डिंग चर्चेचा विषय ठरलं आहे. या या होर्डिंगमध्ये भाजपा नगरसेवकाने आपली नाराजी जाहीर केली आहे.
सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या वतीने हे होर्डिंग लावत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
40 वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपची सेवा करतंय हे आमचं चुकलं का?, सोयीचं राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे आमचं चुकलं का?, असं होर्डिंगवर लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान, महानगरपालिकेची स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये स्थायी समिती अध्यक्षपदासाठी रवी लांडगेंचं नाव आघाडीवर होतं मात्र त्यांना डावलत इतरांना अध्यक्षपद देण्यात आलं. यामुळे रवी लांडगे दुखावले गेले होते त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी शहरभर नाराजीचे होर्डिंग लावले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे
“…मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य अन् खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?”
इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी