सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले; अमृता फडणवीसांचा टोला

0
310

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर टिका केली. आता या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटवरून शेरोशायरी करत नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अमृता फडणवीसांनी यावेळी केली.

हे ही वाचा : “नाना पटोलेंचं वक्तव्य हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, पोलिसांनी त्यांना अटक करावी”

सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले ! असं अमृता फडणवीसांनी म्हटले आहे. याचाच अर्थ, मोदींसारख्या सुर्याला बुडवायचे इरादे ठेवताता नाना पटोलेंसारखे छोटे नेते, पण त्यांना हा अंदाज नाही की, प्रगतीच्या उजेडाला बुडवण्याच्या नादात ते स्वताच जळून खाक होतील, असं अमृता फडणवीसांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

मी शांत बसलो आहे, पण…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

नितेश राणेंना पुन्हा न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालायानेही नितेश राणे यांचा अर्ज फेटाळला

मी नरेंद्र मोदींबद्दल बोललो नाही; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here