Home क्रीडा पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून विजय

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून विजय

हैद्राबाद : कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विराट विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजवर 6 गडी राखून मात केली आहे. भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

विंडीजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद 94 तर लोकेश राहुलने 62 धावांची खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत महत्वपूर्ण भागीदारी रचली.

वेस्ट इंडिजकडून शेमरॉन हेटमायरचं धडाकेबाज अर्धशतक करत 41 चेंडूत 56 धावा केल्या. तर एविन लुईस ने 17 चेंडूत 40 धावा केल्या.भारताकडून युजवेंद्र चहलने २ तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेलही सोडले. यावर भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह याने नाराजी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण स्वागतार्ह वाटतो- राज ठाकरे

“महाराष्ट्राच्या पोलिसांनी पण ह्यातून काही शिकलं पाहिजे”

न्याय झालाय पण ही पद्धत अन्यायकारक- नवाब मलिक

भारतानं टॉस जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय