आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भारत आणि बांगलादेश वुमन्स संघात 3 एकदिवसीय मालिका पार पडली. ही मालिक 1-1 ने बरोबरीत सुटल्याने विजेतेपद वाटून देण्यात आलं आहे.
शेवटचा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का केली नाही, असा प्रश्न आता क्रीडा विश्वातून उपस्थित होत आहेत.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 225 धावा केल्या आणि टीम इंडियाला विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने सर्वगडी बाद 225 धावा केल्या त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
ही बातमी पण वाचा : “मी, अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!” लवकरच….”
यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने दिला जाईल असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. त्या मागचं कारणही जरा वेगळंच आहे. समालोचकांच्या मते, सामन्याचं शेड्युल टाईम पूर्ण झालं होतं. त्यामुळे सुपर ओव्हर खेळली गेली नाही. कारण हा सामना उशिरापर्यंत चालला असं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या डावात सामना पावसामुळे काही काळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे वेळ वाया गेला. तसेच बांगलादेश 50 षटकं, तर भारताने 49.3 षटकं खेळली. पण वातावरण ढगाळ नसताना किंवा पाऊस नसताना असं का केलं असा प्रश्नही क्रीडाविश्वातून उपस्थित होत आहे.
दरम्यान, भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. तर बांगलादेशला विजयासाठी एका विकेटची गरज होती. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच भारताला दोन धावा मिळाल्या. त्यामुळे सामना बरोबरीत आला आणि विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता होती. पण तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंह आऊट झाली आणि सामना बरोबरीत सुटला. यानंतर सामना सुपरओव्हरमध्ये खेळला जाईल, असंच सर्वांना वाटत होता. मात्र सुपर ओव्हर न होता, दोन्ही संघांना विजेतेपद वाटून देण्यात आलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा शरद पवारांकडे वापसी”
दरडीचा अंदाज येत नसेल तर…; राज ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका“विराट कोहलीचं दमदार शतक, तब्बल 5 वर्षांनी परदेशात ठोकलं शतक, ब्रॅडमनच्या विक्रमाशी केली बरोबरी”