मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. या संकटाच्या काळात महाविकास आघाडीतील सर्वंच नेत्यांबरोबर विरोधी पक्षनेत्यांशीही बोलणं सुरू आहे. राज सुद्धा मला सातत्यानं फोन करून सूचना देत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या संकटाच्या काळात सगळेच माझ्यासोबत आहे. जनतेचं सहकार्य मिळतेच आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्षातील नेते मग ते उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अनिल देशमुख यांच्यासह सगळेच सोबत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा सुरू आहे. राज सुद्धा मला सतत फोनवरून बोलतो आहे. सरकारनं काय करायला हवं. राजही त्याच्या सूचना मला देतोय,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात आणि देशात लॉकडाउन असताना होत असलेल्या स्थलांतराबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. संपूर्ण जग सध्या करोनाशी लढत आहे. आज अशी स्थिती आलेली आहे की, कुणीही कुणाच्या मदतीला येऊ शकत नाही. मात्र, महाराष्ट्राला जो काही वेळ मिळाला त्यात आपण आवश्यक ती पावलं उचलली, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
कोरोना ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा राज्यसरकारचा निर्णय- अजित पवार
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवसापासून होणार प्रक्षेपण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच भारतवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन
क्वारंटाइन लोक बाहेर फिरताना दिसल्यास त्यांनाजेलमध्ये टाका; मनसेची मागणी