“शरद पवारांच्या गुगलीला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, पवार साहेबांनी मान्य केलं की,…”

0
406

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एका मुलाखतीत बोलताना, पहाटेच्या शपथविधी प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला.

शरद पवारांनी आमच्याबरोबर डबलगेम केला, त्यामुळेच आमचं सरकार येऊ शकलं नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती., असा गाैफ्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. फडणवीसांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

फडणवीसांच्या डबलगेमच्या आरोपावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. माझे एक सासरे होते, त्यांचं नाव होतं सदू शिंदे. ते देशातले उत्तम गुगली बॉलर होते. त्यांनी त्यांच्या कारकीर्दित अनेक मोठ्या मोठ्या प्लेअर्सच्या विकेट घेतल्या होत्या. मी क्रिकेट खेळलो नसलो तरी गुगली कसा टाकायचा हे मला माहित आहे. त्यांनी विकेट दिली तर विकेट घेतलीच पाहिजे., असा टोला शरद पवारांनी यावेळी फडणवीसांना लगावला. आता शरद पवार-फडणवीसांच्या वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडी घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : …तर आम्ही थेट पंतप्रधान मोदींना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांचं मोठं विधान

एकंदरीत शरद पवार साहेबांनी मान्य केलं की, त्यांनी गुगली टाकली होती म्हणून. कारण ते एकाच वेळी अनेक ठिकाणी गुगल्या टाकत होते., असा टोला एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला.

खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकार घालवलं आणि युतीचं सरकार आलं त्यात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पवार साहेबांना क्लीन बोल्ड केलेलंच आहे. कारण ते त्या (मविआ) सरकारचे प्रमुख होते. मी एवढंच सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा एक्सपर्ट खेळाडू आहेत ते कधी कोणाची विकेट काढतील, कोणाला क्लीन बोल्ड करतील हे काही सांगता येणार नाही., असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“वर्ल्ड कप आधीच टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर?”

शरद पवारांनी भाजप-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारचे पालकमंत्रीही ठरवले होते; भाजपच्या आणखी एका नेत्याचा दावा

अनेक राज्यांमध्ये भाजपचं…; शरद पवार यांची भाजपवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here