मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIAच्या कोठडीत असलेले सचिन वाझेंवरून विरोधीपक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशातच RPI चे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चाललीय. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रामदास आठवलेंनी यावेळी केली आहे.
मुकेश अंबानी मोठे उद्योगपती आहेत. लाखो लोकांना त्यांनी रोजगारही दिलाय. मुकेश अंबानींचं घर उडवण्यामागे सचिन वाझे तर आहेतच, पण त्याचबरोबर आणखी कोण कोण आहे, याची चौकशी व्हायला हवी, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अधिकाऱ्याला संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून झालंय. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास योग्य पद्धतीने केला नाही. त्यामुळेच NIA कडे चौकशी गेलीय, असंही रामदास आठवले म्हणालेत.
सचिन वाझे यांच्या मागे कोण आहे ते शोधून काढावे; महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे pic.twitter.com/ZE7KEtjFtC
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?; जागतिक निद्रा दिनानिमित्त जयंत पाटलांचा भाजपला सवाल
आम्हांला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ताेंडही पहायचं नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
“40 वर्ष भाजपची सेवा करतोय हे आमचं चुकलं का?; पुण्यात नगरसेवकाचं होर्डिंग ठरतोय चर्चेचा विषय
“राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना”