Home महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

नंदुरबार : राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे राज्याला पुन्हा एकदा लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये जो सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. पुन्हा लॉकडाउन करणं एक मार्ग आहे. लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. लोक आता मास्क वापरु लागले आहेत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का याबाबत माहिती अद्याप तरी दिलेली नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?; जागतिक निद्रा दिनानिमित्त जयंत पाटलांचा भाजपला सवाल

आम्हांला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ताेंडही पहायचं नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

“40 वर्ष भाजपची सेवा करतोय हे आमचं चुकलं का?; पुण्यात नगरसेवकाचं होर्डिंग ठरतोय चर्चेचा विषय