“मराठा उमेदवारांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या”

0
153

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रात संभाजीराजे यांनी शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे

महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्यांतर्गत 2018 सालापासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्र शासनाने मागविलेल्या एका अहवालानुसार असे 2185 मराठा उमेदवार असून, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. प्रथमतः कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ताळेबंदी व नंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती, या कारणांमुळे शासनाकडून या उमेदवारांस सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्तीपत्र देण्यास विलंब झाला.

सध्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता, दि. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे ; त्यामुळे शासनाने अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना, ते ज्या पदासाठी पात्र ठरले आहेत, त्याच पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्वरीत शासकीय सेवेत सामावून घ्यावे.तसेच, दि. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी व नंतर सुरू झालेल्या व अद्याप पूर्ण न झालेल्या शासकीय भरती प्रक्रियांमध्ये सहभागी झालेल्या मराठा उमेदवारांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 4 जानेवारी 2021 रोजी काढलेले प्रसिद्धीपत्रक ( एमआयएस-०६१८/सीआर-६१/२०१८/तीन ) मधील कलम 3 मधील उपकलमांमुळे प्रवर्ग निवडण्याबाबत संभ्रम होता. यामुळे सदर प्रक्रियेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी. व ओपन प्रवर्ग निवडला आहे, अशा सर्व मराठा विद्यार्थ्यांना ई.डब्लू.एस. प्रवर्ग निवडण्याचा पर्याय तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा.

दरम्यान, वरील सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून, कोणताही निर्णय अधांतरी न ठेवता, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास न्याय देण्याची ठोस भूमिका शासनाने ठेवावी.

कळावे.
आपला,
( संभाजी छत्रपती )

महत्वाच्या घडामोडी –

“सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ असं म्हणण्याची वेळ आली”

ठाकरे सरकार, निकम्मा कारभार; नाशिक व्हेंटिलेटर प्रकरणावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“मी 96 कुळी मराठा, कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही”

“हसन मुश्रीफांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा, मी त्याला घाबरत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here