आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या, या भाजपाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिलं आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असं प्रतिआव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेय.
हे ही वाचा : राज्यात सरकारचं अस्तित्व नाही अन् उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही- देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सैरभैर झालेत. दोन वर्ष वारंवार हे सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले, राजभवनाच्या माध्यमातूनही प्रयत्न करून काही उपयोग झाला नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे
सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व नेत्यांवर खोट्या केसेसच्या टाकून कारवाई करण्यात आली, महाराष्ट्राला बदनाम केलं. पण सरकार पडत नाही उलट ते भक्कम झाले आहे हे पाहून भाजपा नेत्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या नैराश्येतूनच महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याची भाषा केली गेली आहे. पण भाजपात हिम्मत असेल तर केंद्र सरकार बरखास्त करुन बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, भाजपाचा पराभव नक्की होईल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर…; रामदास आठवलेंचं मोठं विधान
राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच सर्वाधिक मते मिळणार- शिवेंद्रराजे भोसले