जळगाव : राज्य सरकार कोरोनाशी लढा देत असताना विरोधक मात्र घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करत कोरोनाचं संकट संपल्यावर मैदानात या आणि हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपा नेत्यांना दिलं आहे. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
कोरोनासारख्या कठीण काळात विरोधकांकडून महाविकास आघाडीचे सरकार पाडणार असल्याची चर्चा रंगवली जात आहे. उगाच संभ्रम निर्माण केला जात आहे. मध्यप्रदेशात ज्या पद्धतीने वातावरण निर्माण करण्यात आलं होतं त्याच पद्धतीने महाराष्ट्रात वातावरण निर्मिती सुरु आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, विरोधकांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याऐवजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा. मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने तडफडतो, त्याच पद्धतीने विरोधक सत्ता गेल्यामुळे तडफडत आहेत, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…पण आमदारांची फोडाफोड करूनही सत्तांतर होणार नाही- पृथ्वीराज चव्हाण
भाजप हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला पडलाय- जयंत पाटील
देवेंद्र फडणवीसांनी इथल्या युवकांना कमी लेखू नये- जयंत पाटील
खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस