“रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही”

0
232

सोलापूर : पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा. रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही,’ असा इशारा परळीतील मेळाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी चंद्रकांत पाटलांनीही भाषण केलं होतं. त्यावर आज सोलापूरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.

पंकजांनी सांगितलं की अनेकांनी बंड केले त्यामुळे इतिहास घडला. मात्र, बंड हे आपल्या लोकांविरोधात करायचे नसते. आपल्या लोकांसोबत चर्चा करुन मार्ग काढायचा असतो, असं म्हणत पंकजा मुंडे यांच्यावर पाटलांनी निशाणा साधला.

दरम्यान, सोलापूरात कार्यकर्त्यांशी बोलताना पाटलांनी इशारा दिला आहे. अडचणी येत असतील तर त्या सोडवल्या जातील, असं पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांची मंजूरी

-27 जानेवारीला पंकजाताईसोबत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार- प्रितम मुंडे

-बंदी घालण्यात आलेल्या पॉर्न वेबसाईट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा

-“ताईसाहेब काळजी करू नका, महाविकास आघाडीचं सरकार मुंडे साहेबांचं स्मारक नक्की बांधेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here