पुणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले. अशातच अनेक नेते हे राज्य सरकारवर टीका करत आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांनीदेखील राज्य सरकारवर टीका केली आहे..
“मागील वेळी चार सदस्यीय प्रभाग रचना होती; परंतु आता ती बदलून तीन सदस्यीय करण्यात आली. त्यात बराच वेळ गेला. आणि आता पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा घाट घालण्यात आला आहे, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “बंडखोरीमुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ; लोहारा-उमरगा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”
“आता राजकारणाची चीड यायला लागली आहे. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा.” प्रत्येक जण सोईने प्रभाग रचना बदलताना दिसत आहे, असंही वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करावी. तुम्ही कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर हा मनसेचा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“धाराशिवमध्येही शिवसेनेचा भगवा फडकला; 13 पैकी 12 जागांवर मारली बाजी”