उद्धव ठाकरेंना भाजपसोबत यायचं असेल तर…; भाजपच्या मोठ्या नेत्याची खुली ऑफर

0
428

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : दहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली.मात्र आता शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर काल वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे युतीत पुन्हा वाद उफाळून आला. अशातच आता भाजपच्या बड्या नेत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली आहे.

ही बातमी पण वाचा : BCCI अध्यक्षाच्या मुलामुळे, माझं करिअर बर्बाद झालं; टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा गंभीर आरोप

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे. ते मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते टीव्ही९ मराठीशी बोलत होते.

“उद्धव ठाकरे यांना जर भाजपसोबत यायचं असेल तर त्यासाठी त्यांना भाजपची दारं कायम खुली आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी. आम्ही उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत, असं केशवप्रसाद मौर्य म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात गेले. त्यांनी खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली”, अशी टीकाही केशवप्रसाद मौर्य यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी; ‘या’ भाजप नेत्याची मुख्यंत्र्यांवर टीका

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही…; नाना पटोलेंचा इशारा

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत; मनसेचा आक्रमक पवित्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here