आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. यावरून आता शिंदे गटातील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरले असते तर ही वेळ आली नसती. 32 वर्षाचे तरुण होते. ते राज्यभर फिरू शकले असते. हीच अपेक्षा होती. त्या काळातील अपेक्षा ते आज पूर्ण करत आहेत. परमेश्वर त्यांचं भलं करो, असा टोला गुलाबराव पाटलांनी यावेळी आदित्य ठाकरेंना लगावला.
हे ही वाचा : “शिंदे गटाचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत केला शिंदे गटात प्रवेश”
उद्धव ठाकरेंकडे मी 20 आमदार घेऊन गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात पहिला गेलेला मी आमदार नाही. 32 आमदार गेल्यानंतर 33 वा मी आहे. मी उद्धव ठाकरेंना भेटून गेलो. त्यांच्याकडे आमदारांची कैफियत मांडली. त्यात दुरुस्ती केली असती तर बरं झालं असतं असं त्यांना सांगितलं. असं म्हणतात शिवाजी महाराजही युद्धात तह करायचे. उद्धव ठाकरेंनी थोडा तह केला असता तर ही वेळ आलीच नसती, अशी खंत गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीसांचं महत्वाचं विधान, म्हणाल्या…
राष्ट्रवादीचा ‘तो’ पाचवा नेता अजित पवार नाही; भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं
“मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही”