आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होणार, अशा चर्चा सूरू झाल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
इतके राजकीय भूकंप झाले तर मला महाराष्ट्राची काळजी वाटतेय, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच कोणत्या नेत्याची गरज आहे, या प्रक्रियेतत मी नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
ही बातमी पण वाचा : वरात घेऊन नवरदेवीच्या दारात येताच, नवरदेवासोबत भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
“इतके भूकंप झाले तर माझा महाराष्ट्र कसा राहील? याचं मला टेन्शन आहे. महाराष्ट्राचं राजकारण कसं राहील? याचं मला टेन्शन आहे. मला यातले कुठलेही संकेत असण्याचं कारण नाही. कारण मी त्या व्यवस्थेचा भाग नाही. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यातील अध्यक्ष, तसेच राज्यातील नेते याबाबत निर्णय घेतील. भारतीय जनता पक्षाला आणखी काही लोकांची कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची गरज आहे का? याचा निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेत मी नाही. त्यामुळे यावर काही भाष्य करु शकणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर तुम्हांला आवडेल का?; अमृता फडणवीसांनी दिलं अचूक उत्तर, म्हणाल्या…
जळगावात भाजप-शिवसेनेच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो; चर्चेला पुन्हा उधाण
…तर एकनाथ खडसेंचे जावई आत्महत्या करतील; शरद पवारांचं मोठं विधान