आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई । माझे दरवाजे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. ज्यांना ज्यांना माझ्यासोबत मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत. मग ती राजकीय मैत्री असले किंवा वैयक्तिक असेल, असं वांचीतचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. पण, राजकीय नाही, असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात औरंग्याची औलाद खपवून घेतली जाणार नाही; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
ऑगस्टमध्ये इंडियाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला वंचित बहुजन विकास आघाडी जाणार का? यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाष्य केलंय. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, आम्हाला बोलवायचे की नाही हे उद्धव ठाकरे, सोनिया गांधी किंवा शरद पवार यांनाच विचारा. उद्धव ठाकरे हे संभाजी बिग्रेड यांच्यासोबत मेळावा घेत असतील तर त्यात चुकीचे काय आहे. उद्धव ठाकरे आणि संभाजी बिग्रेड यांची युती आहे. त्यामुळे कोणी कुणासोबत मेळावा घ्यावा हे त्यांचे तेच ठरवतील. हा त्यांचा प्रश्न आहे, असे परखड मतही वंचितचे अध्यक्ष प्रकाश आबेडकर यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
जयंत पाटील-अमित शहा यांची भेट झाली की नाही?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…
नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर आता कन्या मानसी देसाईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, चुकीची माहिती…