नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर आता कन्या मानसी देसाईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, चुकीची माहिती…

0
496

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफासते लावून आत्महत्या केली.

कर्जामुळे ते आर्थिक अडचणीत होते आणि त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता नितीन देसाई यांची कन्या मानसी देसाई हिनं प्रतिक्रिया दिली आहे.

चुकीची माहिती पसरवू नका. लवकरच खरं काय ते बाहेर येईल, असं नितीन देसाई यांच्या कन्या मानसी देसाई यांनी म्हटलं आहे. एनआयला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! ‘… या’ कारणामुळे सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने

“मी मानसी चंद्रकांत देसाई, ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मोठी मुलगी. मी माझी आई आणि कुटुंबातर्फे हे स्टेटमेंट देत आहे की माझे बाबा नितीन चंद्रकांत देसाई आम्हाला 2 ऑगस्ट 2023 रोजी सोडून गेले. त्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे., असं मानसी म्हणाली.

हे स्टेटमेंट देण्याचा हाच हेतू आहे की ही दुःखद घटना घडल्यानंतर त्यांच्याबद्दल कर्ज बुडवण्याच्या बातम्या येत आहेत. आम्ही बाबांची बाजू आणि त्यांच्याबरोबर जे घडलं तेच माध्यमांना सांगायचा प्रयत्न करत आहोत. “माझ्या वडिलांवर 181 कोटी रुपयांचं कर्ज होतं, त्यापैकी 86.3 कोटी रुपयांची परतफेड आम्ही फेब्रुवारी 2020 पर्यंत केली होती. नंतर कोरोना आल्याने संपूर्ण जग थांबलं, बॉलीवूडलाही त्याचा फटका बसला. बाबाकडे काम नव्हतं म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला, त्यामुळे पेमेंट्स देण्यात उशीर झाला, नियमित होऊ शकले नाहीत. त्याआधी लोन देणाऱ्या कंपनीने आमच्याकडून सहा महिन्यांचे अॅडव्हान्स पेमेंट मागितले होते. त्यावेळी माझ्या बाबांनी पवईतील ऑफिस विकून त्यांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतरही कुणालाच फसवायचा बाबांचा हेतू नव्हता., असंही मानसीनं यावेळी म्हटलं.

दरम्यान, त्यांनी गेली दोन वर्षे लोन देणाऱ्या कंपनीबरोबर मीटिंग्स करून लोन सेटलमेंट करण्यासाठी किंवा रिस्ट्रक्चर करण्यासाठी खूप प्रयत्न केले, जेणेकरून ते कर्ज फेडू शकतील. कंपनीने त्यांना आश्वासनं दिली की आपण सगळं हँडल करू आणि ते कर्ज फेडण्यात त्यांची मदत करतील. पण दुसरीकडे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. गुंतवणूकदार बाबांची मदत करायला तयार होते. पण कंपनीने त्यांना मदत करू दिली नाही. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की, बाबांबद्दल कोणत्याही खोट्या बातम्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये. माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका, असंही मानसी म्हणाली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! ‘… या’ कारणामुळे सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने

“मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ‘या’ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल”

“आम्ही उद्धव ठाकरे यांना 50 कोटी दिले?: भर सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकच काढलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here