Home महत्वाच्या बातम्या उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला; बारसू रिफायनरीला केलेल्या विरोधावरून भाजपचा उध्दव...

उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला; बारसू रिफायनरीला केलेल्या विरोधावरून भाजपचा उध्दव ठाकरेंवर आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात बारसू गावात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकार आग्रही आहे. परंतु स्थानिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. जनमत लक्षात घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला. यावरून भाजपने उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज तुम्हाला अत्यानंद झाला असेल की तुम्ही आपल्या कोकणातल्या नाणार प्रकल्पाला विरोध करुन पाकिस्तानच्या ढासळत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला, असं भाजपने म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! ‘… या’ कारणामुळे सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने

तुमच्या सुपुत्राने आदित्य ठाकरे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जाण्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. आपल्याकडे सरकारी कंपन्यांबरोबर जो परदेशी गुंतवणूकदार होता त्याने पाकिस्तानात रिफयनरी प्रकल्पासाठी पैसे गुंतवले. आता याची नैतिक जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवू शकता का? असा सवाल भाजपने केला आहे.

दरम्यान, बारसूतल्या प्रस्तावित रिफायनरीचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ‘या’ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल”

“आम्ही उद्धव ठाकरे यांना 50 कोटी दिले?: भर सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकच काढलं”

भाजपाच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..“माझा जीव जाता जाता वाचला”