मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यावर पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
सूडाचं राजकारण करुन शरद पवारांची सुरक्षा हटवण्यात आली असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. जे नेते देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा परत देण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
आज अख्ख्या देशामध्ये ठराविकच अनुभवी नेते आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांचा समावेश होतो. पवारांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा देशाला नक्कीच होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्याविषयी वेळोवेळी बोलले आहेत. पवारांची सुरक्षा जर कमी करण्यात आली असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती चुकीची गोष्ट वाटते, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडेंनीही भाजपवर नाराजी व्यक्त करत आजून किती नीच पातळी गाठणार? आसा सवाल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आजून किती नीच पातळी गाठणार?; धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल
भीमा कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र- शरद पवार
मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे- उद्धव ठाकरे
“माझ्या ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही”