मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेना आणि वन मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष यांच्यावरही एकी मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवरही रेणू शर्मा या तरूणीने बलात्काराचा आरोप केला होता. यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
आज छत्रपती शिवराय असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई झाली असती कदाचित कडेलोटच केला असता. कोणतंही प्रकरण दाबलं गेलं नसतं आणि सर्वांना समान न्याय मिळाला असता, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
कोपर्डीतील आणि देशातील सर्वच पीडितांना तात्काळ न्याय मिळाला असता,महिलांकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. आज महाराज नाहीत त्यामुळे तक्रार करणाऱ्या महिलांनाच बदनाम करणारी टोळी तयार होत आहे, महिला सन्मान फक्त कागदोपत्रीच आहे. बलात्काराचे आरोप असणारे सुद्धा आणि त्यांना पाठीशी घालणारे सुद्धा आज शिवजयंती साजरी करत आहेत. आज “राज्यशासन पेक्षा छत्रपती शासन” हवे होते असंच वाटतय. शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा, असं तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
#आज #छत्रपती #शिवराय #असते #तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई झाली असती कदाचित कडेलोटच…
Posted by Trupti Desai on Thursday, 18 February 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुंबई-पुणे महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; संजय राऊतांचं महत्वाचं विधान
येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात
महिलेकडून Covid-19 चं उल्लंघन; पोलिसानं दंड न करता Kiss करून सोडलं अन् झाला सस्पेंड
चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानावर नवाब मलिक यांच प्रत्युत्तर; म्हणाले…