Home जळगाव गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर…; एकनाथ खडसेंनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर…; एकनाथ खडसेंनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचं आज जळगाव शहरातील मेहरूण परिसरात भूमिपूजन पार पडलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिवंगत ज्येष्ठ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.

गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर त्यांनी या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती बदलली असती. त्यांनी या महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद बदललं असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 5-7 वर्षात जे अनुभवलं तो प्रकार झाला नसता. मात्र दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे आम्हाला अचानक सोडून गेले, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “…या कारणासाठी सांगलीत शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद चव्हाट्यावर”

गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात राज्याची आणखी भरभराट झाली असती. “गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रभर आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते उभे केले. धनंजय मुंडे यांच्यासारखा एक युवा कार्यकर्ता त्यांच्या नेतृत्वात तयार झाला. धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत. राजकारणात त्यांचा वारसा म्हणून गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडेंना पुढे आणलं, असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत राणांना, गुलाबराव पाटलांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

“मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

राज ठाकरेंनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यामुळे…- रामदास आठवले