Home महाराष्ट्र महाशिवआघाडी नाही तर ‘हे’ नाव द्या काँग्रेसच्या नेत्यांची मागणी

महाशिवआघाडी नाही तर ‘हे’ नाव द्या काँग्रेसच्या नेत्यांची मागणी

185

मुंबई : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र तीन पक्षांच्या आघाडीला दिलेल्या नावावरुन काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे.

‘महाशिवआघाडी’ला काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे. त्या ऐवजी ‘महाविकासआघाडी’ असावे अशी आग्रही भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

महाशिवआघाडी या नावातून केवळ शिवसेना या एकाच पक्षाचं नाव अधोरेखित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही, असंं काँग्रेसने म्हटंल आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केले आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.