मुंबई : सिंधुदूर्ग येथील चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेच पाहिजेत असं काही नाही, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं. मात्र, नारायण राणेंनी आता वक्तव्यावरून पलटी मारली आहे.
विकासाची प्रत्येक गोष्ट हे माझं स्वप्न आहे. सिंधुदूर्ग मधील चिपी विमानतळ मी बांधलं आहे. मी मंत्री असताना चिपी विमानतळ तयार झालं आहे. चिपी विमानतळाचे उद्धाटन 9 ऑक्टोबरला होत आहे. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
जे कोणते व्यक्ती बोलत आहेत, त्यांचे सिंधुदूर्गच्या विकासात 1 टक्केसुद्धा श्रेय नाही. मी चिपी विमानतळ बांधलंय, त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यावर त्यांचे स्वागत करू असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचे संकट दूर व्हावे आणि राज्यात सुखसमृद्धी नांदावी यासाठी नारायण राणेंनी गणराया चरणी प्रार्थना केली आहे. नारायण राणेंनी त्यांच्या मुंबईतील घरी गणपतीची स्थापना केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेस पक्ष सध्या संकटात असला तरी, केंद्रात पुन्हा सोनियाचेच दिवस येणार आहेत”
“धक्कादायक! 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर भाजप नेत्यासह 3 जणांचा सामुहिक बलात्कार”
दंडुकेशाही योग्य नाही, सरकार माध्यमांवर दबाव टाकत आहे; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
छगन भुजबळ यांनी कोणतंही चुकीचं काम केलं नव्हतं- गुलाबराव पाटील