नवी दिल्ली : राजस्थानमध्ये वल्लभनगर आणि धारियावाड मतदारसंघात येत्या 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवर राज्यात पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला एकही जागा मिळाल्यास राजकारण सोडेन, असं वक्तव्य राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चंदना यांनी केलं आहे.
हे ही वाचा- “लातूरमध्ये MIM ला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
“राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेस दोन्ही जागा जिंकेल. भाजपाने एकही जागा जिंकली तर मी राजकारण सोडेन. कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपाला पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसइतकी जागा कधीच जिंकता आली नाही आणि ते जिंकूही शकणार नाही, असं अशोक चंदना म्हणाले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत सहा विधानसभा जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. त्यापैकी काँग्रेसने पाच आणि भाजपाने एका जागेवर विजय मिळवला आहे, असंही अशोक चांदना यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार
ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर