Home महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादीच्या आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

राष्ट्रवादीच्या आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

हिंगोली :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी बाळगता थेट छत्रपतींच्या घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

9 ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता. आज दुपारी औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. त्यानंतर शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. त्यावेळी आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.

हे ही वाचा-“KKR चा फायनलमध्ये प्रवेश; रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीवर शेवटच्या षटकात विजय”

दरम्यान, संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत माफी मागितली आहे.

blob:https://www.facebook.com/e41c6e00-873c-4cba-b33f-36f0e730635e

महत्वाच्या घडामोडी –

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”

मी चार वर्षे  मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या कधीही ध्यानात राहिलं नाही; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”