Home महाराष्ट्र मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

सातारा : राज्यात आगामी काळात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने आले आहेत. खासदार उदयनराजे यांनी दुचाकी चालवण्यावरुन खासदार शिवेंद्रराजे भोसले यांनी निशाणा साधला होता.

उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा 5 वर्ष साताराची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती, अशी टीका शिवेंद्रराजेंनी केली होती. यावरून आता उदयनराजेंनी पलटवार केला आहे.

हे देखील वाचा : ठाकरे सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

मला चारचाकी परवडत नाही, म्हणून मी चालत फिरेन, रांगत जाईन, सीटवर उभा राहून जाईन, तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही तसे करा, ही लोकशाही आहे, तुम्हाला कोणी अडवलं नाही” असं उदयनराजे म्हणाले. “हिंमत असेल तर समोरासमोर चर्चेला या, असं आव्हान उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

 राष्ट्रवादीच्या आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

“KKR चा फायनलमध्ये प्रवेश; रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीवर शेवटच्या षटकात विजय”

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”