आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना घडली. यानंतर देशभरात तणावाचं वातावरण होतं. या घटनेचे देशभरातून निषेध करण्यात येत होता. त्यावरून आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
झालेला हा प्रकार निंदनीय आहे. यापूर्वी देखील कर्नाटकात असे प्रकार घडलेले आहेत. मी या घटनेचा जाहीर निषेध करतो, असं सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ही शुल्लक गोष्ट असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आता यांना कर्नाटकचे आणि महाराष्ट्राचे मतदार उत्तर देतील, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “खडसेंना 15 वर्षे लाल दिव्याची गाडी अन् 12 पदं मिळाली, पण विकासकामं करण्यात अपयश, आता दुकानदारी बंद करावी”
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जर कोणता पक्ष पाठिशी घालत असेल तर तो पक्ष या देशात ठेवायचा की नाही हे मतदारच ठरवतील, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
दरम्यान, या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांना मी आवाहन केलं आहे की, त्यांनी कर्नाटक सरकारला सांगून जे कोणी समाजकंटक आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी, असंही उदय सांमत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही; रोहित आर आर पाटलांचा विरोधकांवर घणाघात
अमित शहा म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा; आता नाना पटोले म्हणतात…
“मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे ठरलं होतं, पण ऐनवेळी शिवसेनेने हिंदूत्वाशी तडजोड केली”