आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठा गाैफ्यस्फोट केला होता.
शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत, असा मोठा गाैफ्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला होता. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याविषयी मला माहिती नाही. पण, अशाप्रकारची विधान कोणीही करू नयेत. शरद पवार हे या राज्यातीलचं नव्हे तर देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख स्तंभ आहेत. शरद पवार हे सातत्याने भाजपविरोधी आघाडीसाठी प्रयत्न करतात., असं संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा : औरंगाबादमध्ये शिंदे गट-ठाकरे गटाचे नेते एकाच मंचावर एकत्र?; राजकीय चर्चांना उधाण
भविष्यात प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. अशावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, प्रमुख स्तंभ यांच्यावर सर्वांना ऐकमेकांशी आदर ठेवून बोललं पाहिजे.
प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांच्याशी काही मतभेद असू शकतात. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चाही केली आहे. भविष्यात आम्ही सर्व एकत्र बसून हे मतभेद दूर करू, असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
उध्दव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश
मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी आले एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शरद पवार आजही भाजपबरोबर; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…