मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात या तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारी रोजी तक्रार केली.
यावर भाजप महिला आघाडीने हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नसल्याचं म्हणत मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. यावर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजप महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपमधीलच काही नेते टेन्शनमध्ये आले असतील, असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या #भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर #भाजपा तील काही नेते टेंशन मध्ये आले असतील https://t.co/8wy6inE3jJ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 13, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही”
“आमच्या विरूद्ध 3 पैलवान एकत्र आले, तरी आम्ही पुणे महापालिका जिंकू”
“धनंजय मुंडेंचा मोठा गाैफ्यस्फोट! करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधातून 2 मुलं”