सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर केला होता. यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर देत विनायक राऊतांवर निशाणा साधला आहे.
मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही. मी माझ्या हिंमतीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारलं आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी विनायक राऊतांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. ते सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, विनायक राऊत माझ्यावर आकसापोटी टीका करतात. मुळात वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून परवानगी मिळते. त्यामुळे विनायक राऊत यांचं वक्तव्य म्हणजे त्यांचं अज्ञान दाखवणारे आहे, असं म्हणत राणेंनी राऊतांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना ड्राॅ; रिषभ पंत, चेतेश्वर पुजाराची शानदार खेळी
“राज ठाकरे यांचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं”
नितेश राणेंना फडणवीस तुरूंगात टाकणार होते, पण…; शिवसेनेचा मोठा गाैफ्यस्फोट
गरज नसल्यास माझी सुरक्षाही कमी करा- शरद पवार