“मला चिरडायला हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडेन”

0
524

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : साताऱ्यातील दोन्ही राजे म्हणजेच उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्यात अजूनही शाब्दित युद्ध सूरूच आहे. दोन्ही नेते समोरासमोर आले की, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना पहायला मिळतं. अशातच आता शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.

साताऱ्यातील पंडीत ऑटोमोटीव्ह कंपनी आमदार शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. तसेच कामगारांवर अन्याय करणाऱ्या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देवून चिरडलं पाहिजे, असं उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना उद्देशून अप्रत्यक्ष म्हटलं होतं. यावरून आता शिवेंद्रराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : राज्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार-हर्षवर्धन पाटील आले एकत्र; चर्चांना उधाण

मला चिरडायचं असेल तर हत्तीची गरज नाही. उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन, असा टोला शिवेंद्रराजेंनी यावेळी लगावला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

स्वर युगाचा अंत झाला, आमच्यावरचं मातृतुल्य आशीर्वाद हरपलं; मुख्यमंत्र्यांकडून लता दिदींना श्रद्धांजली अर्पण

आदित्यजी, अमृता फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही…; चित्रा वाघ यांचा टोला

शिवसैनिकांकडून सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊतांकडून प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here