आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असं वादग्रस्त वक्तव्य केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. आता नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा : “पवारांनी आधी फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवला, आता काशीचा घाट दाखवतील”
जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचे ‘या’ 5 मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलत आहे; चद्रंशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल