आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : “मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे”, असं म्हणत काँग्रेस नेता कन्हैया कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
हे ही वाचा : शिवसेना-राष्ट्रावादीमध्ये ठिणगी; प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादीचे शिवसेनेवर गंभीर आरोप
सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी व भाजपवर हल्लाबोल केला.
काँग्रेस पत्र असा पक्ष आहे जो पूर्ण भारतीयतेला सोबत घेऊन चालतो. ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आणि ज्यांना देश विकायचा आहे त्यांनी भाजपमध्ये जावं. देशातील एक व्यक्ती रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे, असंही कन्हैया कुमार यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
अबब! 20 वर्षांची तरुणी पडली 77वर्षीय आजोबांच्या प्रेमात; खोटं बोलून करणार होती लग्न, पण…
“….म्हणून मतदानाच्या आधीच काँग्रेसने बदलला उमेदवार”
“दुनिया मे *** की कमी नही, जरा योगीजी को सुनिये; संजय राऊतांनी व्हिडिओ केला ट्विट