आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला. या पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने यू-टर्न घेतल्यानेच आमची कोंडी झाली, असं भाजप नेते गिरीष महाजन म्हणाले होते. त्यावर, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत गिरीष महाजन यांच्यावर निशाणा साधलाय. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत बोलत होते.
हे ही वाचा : “भाजप-शिवसेना युती होऊ नये ही महाराष्ट्रतील जनतेची इच्छा”
जिल्हा बँक निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर विजयी होईल, असा आपल्याला ठाम विश्वास होता. तो विश्वास खराही ठरला. पक्षाचे तब्बल 11 संचालक निवडून आले आहेत. मात्र, आपण एकत्रित निवडणूक लढविल्यामुळे तिन्ही पक्षाच्या निर्णयानुसारच बँकेत कामकाज करणार आहोत. जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विश्वासघात केला, असे गिरीश महाजन सांगत आहेत. मात्र, हा विश्वासघात नाही, ही तर राजनिती आहे. राजकारण हा काही धर्मादाय दवाखाना नाही. तुमचा जर निवडणूक जिकांयचा विश्वास होता, तर तुम्ही निवडणुकीतून माघार का घेतली? तुम्ही सर्व 21 उमेदवार उभे करायचे होते. परंतु आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यानेच तुम्ही पळ काढला, असं एकनाथ खडसे म्हणाले.
दरम्यान, मी ठरवून भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नाही. आपण अगोदरच सांगितले होते, की त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ देणार नाही. भाजपचे आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील आदी भाजप नेत्यांचे अर्ज बाद झाले नव्हते तरीही त्यांनी माघार घेतली. याचा अर्थ त्यांना आपण निवडून येणार नाही याची खात्री होती, असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; भिवंडीतील आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोवर संप मिटणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सूरूच राहणार- गुणरत्न सदावर्ते
जर नाशिकमध्ये आज निवडणूका झाल्या तर राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढणार; जनतेचा कौल