Home नाशिक जर नाशिकमध्ये आज निवडणूका झाल्या तर राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढणार; जनतेचा कौल

जर नाशिकमध्ये आज निवडणूका झाल्या तर राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढणार; जनतेचा कौल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : ‘सकाळ-साम’ने केलेल्या ‘मूड महाराष्ट्राचा’ सर्वेक्षणातून आज जर निवडणूका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कौल जाणून घेतला आहे. यात नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा लाभ मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

सकाळ-सामच्या सर्वेक्षणानुसार आज निवडणूक झाल्यास नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची असलेली 6 ही संख्या वाढून ती 9 पर्यंत जाऊ शकते. तर भाजप आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात भाजपच नंबर वनचा पक्ष- देवेंद्र फडणवीस

शिवसेनेलाही आज निवडणूका झाल्यास नाशिकमध्ये काही प्रमाणात लाभ मिळण्याची शक्यता आहेत. शिवसेनेचे नाशिक शहरात संख्याबळ वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीविरुद्ध काही मुद्दे मतदारांच्या मनामध्ये असले, तरीही ते निवडणुकीच्या मैदानात स्पष्टपणे दिसून येणार नाहीत, अशी सध्याची स्थिती असल्याचा हा सर्वे सांगत आहे.

दरम्यान, इगतपुरी तालुक्यात काँग्रेसचे महत्त्व आहे. तिथे ते टिकून राहण्याची शक्यता असून, चांदवडमध्ये काँग्रेसला बळ मिळाल्यास त्याचा फायदा पक्षाला फायदा होऊ शकतो. नाशिक शहर वगळता जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग सफल होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचा भाजपला दे धक्का; कल्याणमधील काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार”

मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही; शिवेंद्रराजे भोसलेंचा शशिकांत शिंदेंना इशारा

“भाजपमध्ये गेलेल्या अनेक आमदारांची राष्ट्रवादीत गृहवापसी होणार”