आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच बंडखोर आमदारांचा गट भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे आमदास योगेश रामदास कदम यांनी एक ट्विट केलं आहे.
सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही.. रा. काँ. पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल.., असं योगेश कदम म्हणाले.
हे ही वाचा : …असल्या घमक्यांना भीक घालत नाही; एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका.. मी शिवसैनिक!, असं ट्विट करत योगेश कदम यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.
ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका..
मी शिवसैनिक!
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) June 24, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! भाजपसोबत जाण्याचा शिंदेंचा निर्णय?; व्हिडीओ आला समोर
एकनाथ शिंदेच्या मागे भाजपचा हात आहे, असं वाटतं का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
बरं झालं, मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भिती गेली आणि ते बाहेर पडले; मनसेचा खोचक टोला