आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : मुक्ताईनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण हे आमनेसामने आले आहेत.
मुक्ताईनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी पुन्हा नजमा तडवी यांची वर्णी लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 2021 मध्ये घेतलेला निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या नजमा तडवी यांनी पुन्हा नगराध्यपक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. नजमा तडवी यांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळत जमा केलं नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. पण त्यांना जातवैधता प्रमाणपत्र वेळेत मिळू नये यासाठी काही जणांकडून प्रयत्न करण्यात आले, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला. यावेळी त्यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता.
ही बातमी पण वाचा : “आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, सुर्यकूमार नव्हे, हार्दिक नव्हे, तर ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व”
“खडसे या विषयाचे ऑडीट होणार, ते जनतेसमोर येणार, याशिवाय याला पूर्णविराम नाही”, असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं होतं. यावर एकनाथ खडसे चांगलेच भडकले.
“काय ऑडिट करायचं ते कर, तुला कोणी अडवलं बाबा? मी बाप दाद्यापासून श्रीमंत आहे तुझ्यासारखा मी हमाल किंवा भंगार विकणारा नाही. सरकार तुझं आहे. काय ऑडिट करायचं असेल ते कर. मी आतापर्यंत सर्व पाहून बसलोय ईडी वगैरे”, तुझी आधी किंमत आणि कुवत तपासून घे. मग माझ्यावर बोल”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
लवकरच शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य