Home महाराष्ट्र आजून किती नीच पातळी गाठणार?; धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल

आजून किती नीच पातळी गाठणार?; धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीमधील निवासस्थानी असणारी सुरक्षा हटवण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून सुरक्षा हटवण्याआधी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यावर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांनी ही निषेध नोंदवला आहे.

ईडी चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली. किती नीच पातळी गाठणार? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचं कवच आहे, त्याला भय कुणचं आसणा. केंद्र सरकारच्या संकुचित, कोत्या मनाचा निषेध, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पवारांच्या दिल्लीतील घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान मोदी सरकारकडून हटवण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

भीमा कोरेगाव दंगलीमागे देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र- शरद पवार

मी भगवा खाली ठेवलेला नाही, तर आमचं अंतरंगच भगवं आहे- उद्धव ठाकरे

“माझ्या ‘मराठी’ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही”

मनसेनं झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावं- रामदास आठवले