14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ठ कसा?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

0
370

बुलढाणा : एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत टाॅप-5 मध्ये स्थान मिळालं आहे. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

कोरोना काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?, असा प्रश्न बावनकुळेंनी यावेळी केला. ते बुलढाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणणारा सर्व्हे कुणी केला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण आहे, असं बानवकुळेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

भुजबळ जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहेत, त्यामुळे…; नारायण राणेंची टीका

मंत्रिमंडळातून काढा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचे स्वतःच्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांना पत्र

नारायण राणेंना सूक्ष्म खातं मिळालं, त्यामुळं त्यांचं डोकंही सूक्ष्म झालंय- गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here