आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. आव्हाड शो बंद पाडून माॅलमधून बाहेर गेल्यानंतर तिथे मनसे नेते अविनाश जाधल आले व त्यांनी बंद पाडलेला हर हर महादेव चा शो पुन्हा सूरू केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जितेंद्र आव्हाड हे काही सेन्सॉर बोर्ड नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांनी घाबरायची गरज नाही. मनसे तुमच्यासोबत आहे. संस्कृतीच्या गोष्टी करणाऱ्यांनी अशा प्रकारे येऊन प्रेक्षकांना मारणं ही कोणती संस्कृती आहे?, असा सवाल करत अविनाश जाधवांनी आव्हाडांना जोरदार सुनावलं आहे.
हे ही वाचा : शिंदे सरकार कधी कोसळणार?; आदित्य ठाकरेंनी सांगितला मुहूर्त, म्हणाले…
दरम्यान, मागच्यावेळी तुम्ही तुमच्या बंगल्यात घेऊन, जाऊन एकाला मारलं होतं, तेच आज इथे येऊन केलं. नक्कीच तुम्ही बदलत नाही आहात. तुम्ही लोकांना गृहीत धरत आहात, असंही अविनाश जाधव म्हणाले. तसेच हा चित्रपट सुरु होऊन 9-10 दिवस झाले. काहीतरी स्टंट मारु नका. महाराष्ट्राचे प्रेक्षक तुम्हाला माफ करणार नाही. राज ठाकरे प्रेक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, असंही अविनाश जाधवांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ठाकरे गटात जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कन्येनं हाती बांधलं शिवबंधन”
फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…